Arunabh kumar success story Of TVF-TVF च्या शो समोर बॉलीवूड चे महागडे चित्रपट सुद्धा फेल

टी.व्ही.एफ.च्या शो मध्ये नाही कुठला मोठा स्टार, नाही महागडा सेट, नाही महागड व्ही.एफ.एक्स. तरी OTT वरती प्रेक्षक करताय TVF च्या शो ची तारीफ…….

Arunabh kumar success story Of TVF
Source-Google
  • साधारण चित्रपटांनी OTT वर तोडले मोठ्या चित्रपटांचे रेकोर्ड

मित्रानो आमीर खान प्रोडक्शन ची लापता लेडीज,विधू विनोद चोप्रा ची १२ थ फैल,वरून ग्रोवर ची ऑल इंडिया रँक या चित्रपटांच्या कथा मेन स्ट्रीम चित्रपटांपेक्षा खूप वेगळ्या आहेत.,जेव्हा आपण ऐकता लापता लेडीज सारख्या चित्रपटाने नेटफ्लीक्स वरती अॅनिमल सारक्या चित्रपटाचा रेकॉर्ड तोडला आहे. ट्वेल्थ फेल चित्रपटच कलेक्शन स्टार कास्ट असलेल्या चित्रपटापेक्षा जास्त आहे. अस वाटते भारतात चित्रपट बघण्याची लोकांची  चॉइस बदलत आहे.

भारतात जबरदस्त अॅक्शन,जबरदस्त रोमान्स,महागडे सेट, जबरदस्त व्ही.एफ.एक्स., सार नसलेली कथा आणि ज्यात लॉजीक नसलेल्या संवाद वर शिट्ट्या वाजवणाऱ्या प्रेक्षकाना आता हळू हळू त्या कथा त्यांना आवडू लागल्या आहेत ज्यात त्यांना साधे सेट, मध्यम वर्गाच्या कथा असेल चांगल्या कथा व त्यात व्यवस्थित वाटेल असा रोमान्स असेल. परंतु हे अचानक सुरु झाल नाही.आणि नाही भारतात या गोष्टी ची सुरुवात् मोठ्या पडद्या पासून सुरु झाली.

  • एक साधारण मुलगा कसा झाला  TVF चा फाऊंडर

हि गोष्ट सुरु होते एका बिहारी पोरापासून ज्याला ८० च्या दशकात दूरदर्शन चे धरावाहित खूप आकर्षित करत होते.एक मिडल क्लास मुलगा ज्याने मोठ्या पडद्यावर काही चांगल करण्याच स्वप्न पाहिलं होत.मग त्याने टी.व्ही. शो बनवण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर कोठे काहीच होत नसल्या मुळे. त्याच्या हातात एक असा प्लॅटफॉर्म आला. ज्याच्या विषयी भारतात त्यावेळी खूपच कमी लोकांना माहिती होती.आणि त्या प्लॅटफॉर्म वरती फेमस होऊ शकतो किंवा पैसे कमवू शकतो या बाबत लोकांना काही माहिती नव्हती.आज भारतात यु ट्यूब वरती शेकडो  व्हिडीओ अपलोड  होत असले तरीही. प्रत्येक दुसऱ्या दिवशी नवे नवे क्रियेटर आपल्याला बघायला मिळते. लोकांना नवे नवे शो,फिल्म बनवण्याची हिम्मत  होते  तर त्याच्या मागे सगळ्यात मोठ योगदान अरुणभ कुमार याचं आहे.

  • लहानपनी ज्यांना बघायचा टी.व्ही वर आज त्यांच्या सोबत करतोय काम..

अरुणभ कुमार याचं जन्म  २६ नोव्हेंबर १९८२ साली  बिहार च्या मुजफ्फरपूर मध्ये झाला.एका साधारण कुटुंबात झाला होता. हि ती वेळ होती जेव्हा भारतात प्रत्येकाच्या घरात टी.व्ही.नव्हता.अरुणभ कुमार सुद्धा जेव्हा १० वर्षाचे झाले तेव्हा त्यांना सुद्धा टी.व्ही. पाहण्या साठी दुसऱ्यांच्या घरात जावे लागत होते.जेव्हा लोकांना जास्त अॅक्शन असलेले चित्रपट पाहायला आवडत होते. तेव्हा अरुणभ यांना दूरदर्शन वरील कार्यक्रम पाहायला आवडत असत.एका मुलाखती मध्ये अरुणभ सांगतो की लहानपनी टी.व्ही. वरती मुल्लाह नसिरुद्दीन या शो मध्ये रघुवीर यादव यांना काम करत असताना बघत असत.अरुणभ ने दूरदर्शन वर द टर्निंग पोइंट हा शो पहिला होता. जो सायन्स बेस शो होता.खूपच विचित्र आहे की शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांना पसंत करणाऱ्या जनरेशन मध्ये असे लोक पसंत येत होते ज्यांना त्या वेळी कोणीच पसंत करत नव्हते.

  • वडिलांना अरुणभ ला बनवायचे होते इंजीनियर-Arunabh kumar success story Of TVF

अरुणभ लहान पनापासून खूपच हुशार विद्यार्थी होते,म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना कोटा येथे पाठवले. अरुणभ कुमार यांनी JEE ची परीक्षा दिली होती.परंतु ती काही क्रॅक नाही. झाली. मग अरुणभ ने IIT ची तैयारी करणे सुरु केली.अरुणभ हुशार विद्यार्थी होतेच आणि त्याचं वेळी त्यांची निवड IIT खरगपूर येथे झाली. आणि मग त्यांना कळले अभ्यासाचा रस्ता आणि अभियांत्रिक होण्याचा रस्ता तेवढा सोपा नाही आहे. जेवढा त्यांना वाटत होता.अस सांगितल्या जाते की अरुणभ पहिल्या वर्षी सात विषयात नापास झाले होते.कारण याच दरम्यान त्यांनी अभिनयात आणि फिल्म मेकिंग मध्ये काम करणे सुरु केले होते.ज्या वर्षी ते फेल झाले होते त्या वर्षी त्यांना सर्वोत्तम कलाकाराचा चा पुरस्कार मिळाला होता.आणि याच दरम्यान “व्हेअर इज माय माइंड” नावाची १४ मिन. शोर्ट फिल्म बनवली होती.हे सगळ करत असताना त्यांनी IIT क्लिअर करून फिल्म मेकिंग मध्येच आपल करिअर करायचं हे निशिच्त केल.

  • यु.एस. एअर. फोर्स मध्ये केला पाहिला जॉब

अरुणभ ला IIT क्लीअर केल्या नंतर अरुणभ ला ६ महिन्या साठी रिसर्च कन्सल्टंटची नौकरी मिळाली. …आणि यानंतर अरुणभ आपल्या प्रोजेक्ट साठी मुंबई ला आले.आणि आजू बाजूच्या लोकांसमवेत ओळख निर्माण करायला लागले.अरुणभ यांना आता त्याचं स्वप्न पूर्ण करायचं होत. म्हणून मग त्यांनी वेगवेगळ्या प्रोडक्शन हाउस मध्ये त्यांनी जाणं येन सुरु केल.

  • ओम शांती ओम या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम

वर्ष २००७ साली त्यांना शाहरुख खान च्या प्रोडक्शन मध्ये व फराह खान दिगदर्शना खाली बनत असलेल्या ओम शांती ओम या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली ज्यात सेटवर त्यांनी रनर चे काम केले.त्यांना सेट वर सामान आणणे नेण्यापर्यंत प्रत्येक छोट मोठ काम केल.अरुणभ आपल्या मुलाखतीत सांगतात की एक वर्ष फराह खान च्या दिग्दर्शनाखाली काम करण आणि त्यना एक इंटर्शीप सारख होत.

इतक्या मोठ्या चित्रपटाचा अनुभव घेऊन निघालेले अरुणभ यांच्या कडे सध्या काही जुगाड नव्हता.ज्याने त्यांचा खर्च निघेल त्यांनी टी.व्ही. कडे जाण्याचा निर्णय घेतलं आणि इंजीनीअरिंग डायरी नावाचा शो लिहिला.त्यावेळी अरुणभ ने एम टीव्ही सोबत कनेक्ट केल काही वेळ विचार विनिमय चालला आणि नंतर शो रिजेक्ट झाला.आणि नंतर  अरुणभ यांना ७०,००० म्युझिक व्हिडीवो च काम मिळाल आणि पैसे पण मिळाले.परंतु काही दिवसातच पैसे खतम झाले.अरुणभ प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी वर पैसे उडवायचे.

  • गोव्यात हॉटेल मध्ये वेटर चे काम

मुंबईत असताना त्यांना पैशाची आर्थिक तंगी जाणवत असल्या मुळे त्यांनी गोव्याला एका रेस्टॉरंट मध्ये  क्राउड हँड्लिंग चे काम करत होते.हे काम करत असताना तेथेच त्यांना एका बिल्डर च्या कंन्सट्रकशन साइडचा व्हिडीओ बनवण्याच काम मिळाल. अरुणभ ला हे काम खूप आवडल अरुणभ ला या कामासाठी चांगले पैसे मिळाले.आणि नंतर त्यांनी वेग वेगळ्या लोकांसाठी व्हिडीवो बनवण्याचे काम सुरु केले. छोट्या मोठ्या ब्रांड साठी जाहिरात सुद्धा बनवायला सुरुवात केली अशा प्रकरे अरुणभ चा खर्च कसा तरी निघत होता.वर्ष २०११ च्या शेवट पर्यत त्यांनी हे काम केल आणि नंतर. वाचवल्या नंतर इंजिनियर डायरी वर पुन्हा आपल काम सुरु केल.

यावेळी  भारतात यु ट्युब  बूम करत होत.अरुणभ लं वाटल मुंबईत खूप अशे लोक आहे ज्यांना नवीन काही करायचे आहे.आणि असे पण लोक आहे ज्यांना कुठ काही काम मिळत नाही आहे.आणि ते काही नं काही काम शोधात आहे.अरुणभ कुमार ने इंजिनियर डायरी चा पायलट पार्ट तैयार सुद्धा केला होता.आणि हळू हळू आपले कॉलेज फ्रेंड स्टेज पार्टनर बाकी लहान सहान कलाकार व टेक्निशियन ते शोधत होते आणि मग त्यांना ते मिळाले.वसंत बाला आणि अमित मसुरकर हे अरुणभ कुमार यांचे खूपचांगले मित्र बनले होते. अशा काही लोकांसोबत त्यांनी  रोडीजचा sab-Q-tiyapa हा स्पुफ  शो बनवला ज्यात एफ.टी.आय.आय च्या काही टेक्निशियन सुद्धा काम केल. THE PITCHER डायरेक्ट  करणारे अमित गोलाणी त्या वेळी बँकेत नौकरी करत होते.ते सुद्धा अरुणभ सोबत काम करायला लागले. अरुणभ कुमार ने आपल्या एका मुलाखती सांगितल जेव्हा त्यांच्या कडे पैसे होते त्यांची स्वतःची टीम होती आणि भारतात लोक त्यावेळी यु ट्यूब ला ओळखायला लागले होते.

तेव्हा त्यांनी INGLOURIOUS BASTERDS चा स्पूफ  INGLOURIOUS SENIORS नावाने तैयार केला.आणि हा पहिला कंटेंट होता जो अरुणभ ने यु ट्युब वरती अपलोड केला.कॉर्पोरेट ए.व्ही. बनवल्या नंतर जे पैसे वाचत  होते .त्या पैशात अरुणभ यांनी TVF हे नाव विकत घेतेले. आणि TVF वरती पाहिलं काम सुद्धा याच पैशात झाल होत.में जून २०११ मध्ये हे सर्व चालू होत.आणि जेव्हा त्यांच्या पहिल्या व्हिडीवो वर दोन दिवसात १७०० व्हीव्स आले तेव्हा अरुणभ कुमार ने यु ट्युब साठी एक योग्य शो डिजाईन करायला घेतला  त्यावेळी रोडीस ची फॅण फोल्लोविंग खूप होती.आणि लोग या शो ला पसंत सुद्धा करत होते.मग अरुणभ ने या शो वर स्पुफ बनवणे सुरु केले.IIT खरगपूर  मधून एका जुनियर ने बिस्वपती सरकार ने TVF जॉईन केल.आणि पूर्ण स्क्रिप्ट पूर्ण करण्याच काम बिस्वप्ती सरकार ने हाती घेतल.त्यानंतर कॉमेडीयन विपुल गोयल ने त्यात काही जोक्स अॅड करणे सुरु केले.आणि इथूनच TVF च्या व्हायरल विडीवो बनवण्याचे काम सुरु झाले.परंतु हा प्रवास अजून तरी सोपा नव्हता.

  • टीमला सॅलरी देण्याकरिता नव्हते पैसे.

अरुणभ जवळ आपल्या टीम ला सॅलरी देण्या करीत पैसे नव्हते.तेव्हा अरुणभ ने मित्रा जवळून ६५००० रुपयाचा जुगाड केला.अरुणभ चे काही मित्र मोठ्या मोठ्या ब्रांडस बरोबर काम करत होते.अरुणभ चे काही मित्र अमेरिकेत मोठ मोठ्या प्रोडक्शन मध्ये काम करत होते.वर्ष २०१३ मध्ये त्यांना डाउट होत होते. की हे जे काही तो करतो आहे त्यात काही भविष्य आहे की नाही.वर्ष २०११ मध्ये अरुणभ ने एक पेज ची कथा लिहिली आणि यात सर्व अरुणभ ने आपल्या मित्रांचे अनुभव लिहिले या गोष्टी वर लिहित असताना भारतात फ्लिपकार्ट ची सुरुवात घेत त्याला लक्षात घेऊन बनवली होती.परंतु ती अजून तैयार झाली नव्हती.परंतु वर्ष २०१४ मध्ये बिस्वपती सरकार ने ती पूर्ण केली. TVF ने किंग फिशर सोबत १५ ते २० लाख रुपयात ५ एपिसोडे चा करार केला.आणि मग ती कथा लिहिण्यास सुरुवात झाली.आणि त्यानंतर जो शो सुरु झाला तो  THE PTICHERS होता.

THE PITCHERS हा यु ट्युब वरती भारताची पहिली वेब सेरीस बनण्या साठी तैयार होती. काम पण पूर्ण झालाच होत.परंतु मध्येच Permanent Roommates साठी गौरव मुंजाल ने  अरुणभ ला कन्विन्स केल.हा कंटेंट THE PITCHERS च्या आधी प्रदर्शित  झाला.जी भारतात बलेली पहिली वेब सेरीस सांगितल्या जाते.

  • TVF ने भारतात बनवल वेब सिरीज चा चलन-Arunabh kumar success story Of TVF

हे सगळ TVF ने मुळे भारतात वेब सिरीज चा चलन सुरु झाला होता.THE PITCHERS च्या हिट झाल्या नंतर खुप साऱ्या लोकांनी काम करण सुरु केल होत.  आज प्रत्येक OTT वरती आणि यु ट्यूब वरती लोक आपली वेब सिरीज बनवून रिलीज करत आहे. हे भारताच्या डिजिटल मेडिया इंडिया मध्ये हे एक क्रांती करी काम होत होत.इथून सगळ व्यवस्थित होत सुरु झाल होत.अरुणभ ने आपल्या आवडत्या कलाकारांबरोबर काम करणे सुरु केल.ज्यांना लहान पानापासून बघत अरुनभ मोठा झाला होता.शाहरुख खानने त्यांच्या एका शो साठी कोलाब्रेशन केल होत.

लोकांनी TVF बद्दल  बोलणे सुरु केले होते.अरुणभ ने हळू हळू स्पुफ बनवत जे चॅनल सुरु केल होत. त्याच्या रियल लाईफ च्या अनुभावर गोष्टी सुरु झाल्या होत्या.अरुणभ ने आपल्या IIT चा  अनुभव कोटा फक्ट्री या वेब सिरीज मधून दाखवलं.ज्या पद्धतीने ते लोकांसोर दाखवल गेल होत.तिथे कारण जोहर च्या दाखवलेले चित्रपट सोडून लोक TVF चे शो पसंत करत होते.  पर्मनंट रूम मेट्स साठी २०१४ मध्ये सुरु झाली होती.२०१५ मध्ये हि जगात दुसऱ्यांदा जास्त पहिली गेलेली वेब सिरीज आहे. आज सुद्धा imdb वरती भारतातील TVF च्या वेब सिरीज आहे. सन २०१६ मध्ये TVF ला आपली पहिली फंडिंग १० लाख मिलियन डॉलर मिळाली होती.ज्यात पंचायत आणि अॅस्पिरंट सारखे शो बनले गेले होते. THE PITCHER चा नवा सीजन सुद्धा आला.आता TVF एक ग्लोबल ब्रांड बनला होता.TVF ने आतापर्यंत खूप मोठ मोठ्या ब्रांड बरोबर काम केले होत ज्यात ओला flipcart,vodofone, xiomi सारखे मोठे नाव शामिल आहे.

आज पंचायत हि वेब सिरीज amazon prime वरती चांगलीच गाजत आहे.TVF च्या कोटा फॅक्टरी,गुल्लक हे शो बघताना लोक कुठे तरी स्वतःला अनुभवतात.TVF ने मिडल क्लास फमिली गाव आणि शहराला खूप चांगल्या पद्धतीने लोकांना दाखवले आहे.आता TVF सोबत NETFLIX आणि AMAZON PRIME सुद्धा काम करत आहे. कारण या चॅनल ने आपल्या सिम्प्लीसीटी ला चांगलच हाताळले आहे.आज पण तुम्ही TVF च्या जुन्या वेब सेरीस जर बघाल तर आज सुद्धा त्या बघायला खूप सुंदर वाटतात.

Leave a Comment