सान्या मल्होत्रा अभिनित मिसेस हा चित्रपट ७ फेब्रुवारी २०२५ रोजी झि-फाईव वरती प्रदर्शित झाला. ज्यो बेबी लिखित –दिग्दर्शित द ग्रेट इंडियन किचन या मल्याळी सिनेमाचा हिंदी रिमेक मिसेस आहे.१११ मिनिटाची हि फिल्म हरमन बवेजा निर्मित असून सान्या मल्होत्रा च्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले आहे. हा चित्रपट म्हणजे एका नव विहाहीतच वधूचे लग्न झाल्यवर संसारात होणारी कुचंबना दाखवण्यात आली आहे.या चित्रपटाचे आय.एम.डी.बी. रेटिंग १० पैकी ६.८ आहे.
ज्यो बेबी लिखित –दिग्दर्शित द ग्रेट इंडियन किचन या मल्याळी सिनेमाचा हिंदी रिमेक मिसेस नुकताच प्रदर्शित झाला आहे.२०२१मध्ये मुख्य मल्याळी सिनेमा द ग्रेट इंडियन किचन अॅमेझोन प्राईम वरती प्रदर्शित झाला होता.तर त्या मल्याळी सिनेमाचा हिंदी रिमेक मिसेस झी फाईव्ह वरती प्रदर्शित झाला आहे.अर्थातच या दोन्ही चित्रपटाचा विषय सारखा असला तरी त्यांचा कथानकात आणि त्यांच्या सादरीकरणात कमालीच अंतर आहे.त्यामुळे द ग्रेट इंडियन किचन प्रमाणे मिसेस च्या नायिकेची मनोवस्था प्रेक्षकांना भिडत नाही.
मूळ मल्याळी सिनेमातून स्वयंपाक घरात तासंतास राबणाऱ्यास्त्रियांची कुचंबना दाखवली होती.त्या कथेतील केंदस्थानी कुटुंबातील नवविवाहित मुलगी होती.व्हरांड्यात आराम खुर्चीवर वृत्तपत्र वाचत बसलेल्या सासऱ्याला टूथब्रश हातात आणून द्यावा लागणे,डायनिंग टेबल वर ताट मांडल्यावर पानात वाढल्याशिवाय न खाणारा सासरा आणि नवरा बघितल्यावर तिला आयुष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे. याची कल्पना येते. द ग्रेट इंडियन किचन या मूळ मल्याळी सिनेमात संवाद खूप मोजके आहे. इतके की आपल्याला नायिकेच नावही समजत नाही.तिच्या रोजच्या कामातून कथानक उलगडत जाते.आणि एका नृत्यकुशल,हुशार स्त्रीची स्वयंपाक घर आणि रोजच्या कामात कशी कुचंबना होत आहे हे लक्षात येते.कथानक पुढे सरकताना,सबरीमला आंदोलन, अयप्पा मंदिर आणि त्या अनुषंगिक परंपरा याचा उल्लेख येत राहतो.पण ठोस विधाने,चटपटीत संवाद नसतानाही आपल्याला तिथल्या वास्तवाचे गांभीर्य समजते.निमिषा सजयन आणि सुरज वेंजरामोद्द यांचा नैसर्गिक अभिनयाने रोजचे प्रसंग जिवंत होतात.निमिशाच्या मनातले द्वंद होणारी फरफट तिच्या कृतीतून चेहऱ्यावर दिसते राहते.
हिंदी मध्ये द ग्रेट इंडियन किचन चा मिसेस या नावाने रिमेके करण्यात आला असून हरमन बवेजा आणि अनुसिंग चौधरी यांनी नवरा व सासरा या दोघांना डॉक्टर बनवले आहे.मूळ सिनेमात सासरा कर्मठ होता,हिंदी मध्ये त्याला डॉक्टर दाखवून लेखकाने नेमके काय साध्य केले आहे हे बिलकुल काळात नाही,नववधूला मासिक पाळीच्या दिवसात बाहेर बसण्याची प्रथा या डॉक्टरांच्या घरातही पाळावी लागते हे जरा मिसेस बघतांना विचित्र वाटते.मल्याळी मध्ये नायिकेला सतत स्वयंपाक घरात बघून प्रेक्षकांना काहीसा उबग येतो,पण हिंदी मध्ये मात्र डिझायनर ड्रेस घालणारी सुंदर नायिका सासू कडून अनेक उत्तमोत्तम पदार्थ शिकून घेताना अशा प्रकारे दाखवली आहे की,नायिका आणि प्रेक्षकही स्वयंपाक बनवण्याची प्रक्रिया बघण्याचा आनंद घेतात.स्वयंपाक घरात रोज दिवसभर काम करणाऱ्या नायिकेला उत्तमोत्तम ड्रेस परिधान करून इतके समजवले आहे की,अशा उत्तम दृश्यांमुळे तिला होणारा मन:स्ताप प्रेक्षकांपर्यंत अजिबात पोहचत नाही.
मिसेस मधील नायिका नृत्याचा रियाज करण्याएवजी नृत्य करताना दिसते,ती भरत नाट्यम किंवा कथ्थक न शिकता बॉलीवूड डान्स करते.मल्याळी सिनेमाच्या सुरुवातीला नायिका नृताचा रियाज करताना दिसते.त्यातून तिचा नृत्याचा ध्यास जाणवतो.पण हिंदीत सिनेमाची सुरुवात नायिकेच्या बॉलीवूड छाप नृत्याने होतो. द ग्रेट इंडियन किचन या मूळ मल्याळी सिनेमात एकूणच केरळची संस्कृती,तिथले निसर्गसौंदर्य,स्थानिक लोकांची मानसिकता निर्भीडपणे दाखवतो. मिसेस मध्ये तो आणि ती नेमके कोणत्या राज्यात आहेत हेच कळत नाही.सासरच्या लोकांची जुनाट मते दाखवताना कोणत्या संस्कृतीवर भाष्य व टीका करणे हेतुपुर्वर्क टाळले आहे.त्यामुळे हिंदी सिनेमाचे लेखक –दिग्दर्शक इतके कडेकडेने का पोहतात,हा प्रश्न पडतो.
द ग्रेट इंडियन किचन या मूळ सिनेमात सलू थॉमस यांचा कॅमेरा बोलतो,नायिका सर्वांच्या पानातले खरकटे काढत असल्याचे बघताना आपल्याला अस्वस्थ वाटत असेल तर आपल्या घरातल्या स्त्रिया रोज हेच काम कसे करत असतील,असा विचार प्रेक्षकांच्या मनात येतो.बेडरूममध्येही स्त्रीला स्वत: च्या भावना व्यक्त करता येत नाहीत.नकाराधिकार वापरता येत नाही,ह दृश्य मूळ मल्याळी सिनेमात द ग्रेट इंडियन किचन मध्ये जितके प्रभावी झाले आहे.तितके हिंदी रिमेक मिसेस मध्ये ते मनाल भिडत नाही.
मिसेस च्या शेवटी नायिका नवऱ्याच्या कारची किल्ली घेऊन घर सोडते. तेव्हा आत मध्ये सासऱ्याच्या वाढदिवसाची पार्टी सुरु असते.ती स्वत: कार चालवत माहेरी जाते आणि लगेच बॉलीवूड छाप नृत्य करते.ते नृत्य होताच तिला उदंड प्रतिसाद मिळतो. द ग्रेट इंडियन किचन या मुळ मल्याळी सिनेमात नायिका शेवटी नायिकेच्या घरात पुरुषप्रधान कर्मकांड सुरु असते.ती घर सोडून रस्त्याने तडफेने चालू लागते.त्या वेळी पार्श्वभूमीवर घरातल्या बायका रोजची कामे करताना दिसते.मुली घरकाम करताना आणि मुल खेळताना दिसतात.काही स्त्रिया मंदिरात प्रवेश न मिळणे आणि रीतीरिवाज पाळण्यविरुद्ध निषेध करताना दिसतात.कालांतराने ती नृत्यामध्ये करियर करताना जे नृत्य नाट्य सादर होते ते सुद्धा अर्थपूर्ण आहे.
विशेष म्हणजे द ग्रेट इंडियन किचन या मूळ मल्याळी सिनेमा आणि त्याचा हिंदी रिमेक मिसेस या दोन्ही सिनेमात फरक जाणवतो. मिसेस ची नायिका सान्या मल्होत्राचा अभिनय उत्तम आहे.पण दिग्दर्शकाने तिची व्यक्तिरेखा उजळून दाख्ण्याचा अनावश्यक प्रयत्न केल्याचे दिसते.प्रतिक उत्पल यांचे कलादिग्दर्शन सिनेमा सुंदर आणि प्रेक्षणीय करण्यावर भर देतो.जे या विषयालाअजिबात सूट होत नाही.हिंदीवालेसिनेमा चकचक करण्यावर खूप जास्त भर देतात.त्या उलट मल्याळी दिग्दर्शक कथेचा विषय प्रभावीपणे पोहोचवण्याला प्राधान्य देतात.त्यामुळेमल्याळी सिनेमा आशयघन सिद्ध होतात.व त्याचे हिंदी रिमेक केवळ प्रेक्षणीय होतात.
मिसेस हा चित्रपट आरती कडव या दिग्दर्शिकेने दिग्दर्शित केला असून या आधी त्यांनी ५५ km/sec (२०२०), कार्गो (२०१९),टाईम मशीन (२०१६ ) अशा काही लघुपटाचे दिग्दर्शन केले आहेत.मिसेस या चित्रपटात सान्या मल्होत्रा हिने रिचा शर्मा (मिसेस),निशांत दहिया याने दिवाकर कुमार,कंवलजीत सिंघ यांनी सासऱ्याची भूमिका तसेच म्रीणाल कुलकर्णी यांनी सान्याच्या आईची भूमिका केली आहे. हरमन बवेजा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून पटकथा हरमन बवेजा व अनु सिंग चौधरी यांनी लिहिली आहे. द ग्रेट इंडियन किचन हा मूळ चित्रपट बघितल्यावरती मिसेस हा चित्रपट बघायची इच्छा होत नाही.कारण ज्या सुंदर तसेच आपली परंपरा द ग्रेट इंडियन किचन मध्ये दाखवण्यात आली आहे ज्या भावनेने प्रेक्षक हा चित्रपट बघतात त्याच आवडीने मिसेस प्रेक्षकांच्या मनाला भिडत नाही.मिसेस म्हणजे एक चकचकाक करून बनवलेला चित्रपट त्यातल्या त्यात सान्या मल्होत्रा हिने केलेली रिचा ची भूमिका जिचे प्रेक्षकांनी तसेच समीक्षकांनी चांगलेच कौतुक केलेले आहे.सान्या मल्होत्रा साठी हा चित्रपट नक्कीच बघावा.
मिसेस या चित्रपटाचा प्रिमियर २०२४ मध्ये इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबोर्न मध्ये झाला असून new york indian film festival मध्ये या चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात आले.७ फेब्रुवारी २०२५ मध्ये झि-फाईव वरती हा चित्रपट प्रदर्शित झाला.
या चित्रपटाचे आय.एम.डी.बी.रेटिंग १० पैकी ६.८ असून एन.डी.टी.व्ही. ने या चित्रपटाला ३.५ स्टार दिले आहेत.रेडीफ.कोम ने या चित्रपटाला ४.५ स्टार दिले आहे.द इंडियन एस्प्रेस ने या चित्रपटाला ५ पैकी ३ स्टार दिले आहेत.बॉलीवूड हंगामाने या चित्रपटाला ५ पैकी ३ स्टार दिले असून मिसेस हा द ग्रेट इंडियन किचन चा विश्वासू रिमेक असून सान्या मल्होत्रा चा अभिनय या चित्रपट विश्वसनीय असल्याचे लिहते.इंडिया टुडे ने या चित्रपटाला ३.५ स्टार दिले आहे.चित्रपट समीक्षक सुचित्रा त्यागी ने या चित्रपटाचे कौतुक करत मिसेस हा द ग्रेट इंडियन किचन या मल्याळी चित्रपटाचा विश्वासू रिमेक असून गाणे आणू नृत्य वगळता चित्रपटाचा प्रत्येक बीट जवळजवळ मूळ सारखाच आहे.जरी एखाद्याने ज्यो बेबी लिखित –दिग्दर्शित द ग्रेट इंडियन किचन या मल्याळी पहिला नसेल तरी त्यांनी मिसेस हा चित्रपट पाहावा.जो एकदरीत बॉलीवूड प्रमाणे मसाला पद्धतीने बनवलेला आहे.