All we Imagine as Light

पायल कपाडिया लिखित व दिग्दर्शित  २०२४ मध्ये प्रदर्शित झालेली फिल्म All we Imagine as Light  डिस्नी हॉटस्टार वरती प्रेक्षांसाठी उपलब्ध आहे.प्रत्येकाने बघावी अशी हि फिल्म जिचा प्रिमियर कान्स चित्रपट महोत्सवात झाला.तसेच या फिल्म ला बेस्ट फॉरेण लँगवेज व बेस्ट दिग्दर्शक असे दोन नॉमिनेशन सुद्धा मिळाले.मुंबईतील झगमगत्या दुनियात संघर्षासाठी झगडणाऱ्या स्त्रियांची कथा यात पायल कपाडियाने खूप सुंदर पद्धतीने दाखवलेली आहे. कनी कुश्रुती, छाया कदम ,दिव्या प्रभा अभिनित हा चित्रपट प्रत्येकाने बघावा असा आहे.

All we Imagine as Light
All we Imagine as Light / Photo credit -Imdb

All we Imagine as Light हा सिनेमा पायल कपाडिया दिग्दर्शित व लिखित असून ज्याच आय.एम.डी. बी. रेटिंग ७.२ आहे.फ्रांस,भारत,नेदरलँड आणि लक्स्मबर्ग अशा चार निर्मात्याच्या संयुक्त प्रयत्नाने हा सिनेमा प्रदर्शित झाला.कान्स चित्रपट महोत्सवा व्यतिरिक्त सुद्धा या चित्रपटाने ग्रां. प्री.अवार्ड सारखे आणखी प्रतिष्टीत अवार्ड सुद्धा या सिनेमाने पटकावले असून. सर्वोत्कृष्ट  दिग्दर्शक म्हणून गोल्डन ग्लोब अवार्ड साठी सुद्धा All we Imagine as Light चं नॉमिनेशन झाल. मुंबई या महानगरातील झगमगाटीच्या दुनियेत महिलांच्या संघर्षावर प्रकाशझोत या चित्रपटात लेखक दिग्दर्शक पायल कपाडिया यांनी मांडला आहे.या मुंबईतील झागामागाटीच्या जगात प्रत्येक व्यक्ती असो वा स्त्री प्रत्येका च्या जीवनात खूप अंधार आहे.ते या चित्रपटात कॅमेरा ने खूप चांगल्या पद्धतीने टिपले आहे,आणि स्क्रीन वर बघताना कळते.

All we Imagine as Light या सिनेमात मोठे शहर नौकरी देते म्हणून अनेक गाव शहरांतून लोक मुंबईत येतात.अशा मोठ्या शहराचा आणखी एक गुण म्हणजे रोजच्या घाई गडबडीत तुमचा शेजारी काय करतो.त्यांचे खासगी जीवन कसे आहे.याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नसतो.मुंबईत सगळे काही मिळेल पण जागा मिळणे महाकठीण आहे.हि मुंबई २४ तास जागी असते.कारण तिच्या कानाकोपऱ्यात कोणी ना कोणी काम करत असतात.अशा शहरात रात्रंदिन काम करणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न त्यांची  घुसमट आणखी वेगळी.कान्स फिल्म फेस्टीव्हल मध्ये नावाजलेल्या आणि आता डिस्ने  हॉटस्टार वर आलेल्या All we Imagine as Light  या सिनेमाने मुंबईतील अशा झगडणाऱ्या स्त्रियांचा  संघर्ष समोर आणला आहे.आपल्याला दिसणाऱ्या या शहराच्या वरवरच्या लखलखाटा मागे दडलेल्या अंधाऱ्या कोपऱ्यांवर हा सिनेमा प्रकाश झोत टाकतो.

सिनेमाच्या सुरुवातीला अशीच रात्रभर जगणारी मुंबई दिसते..कोणी आपल्या कुटुंबाशी भांडण करून घर सोडून मुंबईत आलेला असतो.कोणी गरोदर असल्यामुळे तिथे आलेली असते.पण तिला इथे आल्यावर राहण्यासाठी जागा आणि नौकरी मिळालेली आहे.कोणी केरळवरून आलेली आहे,तर कोणी गुजरात मधून कोणी महाराष्ट्रातल्या गावाकडून आलेला आहे.त्यामुळे या सिनेमातील अनेक पात्रे वेगवेगळ्या भाषेत संवाद करताना दिसतात,हिच खरी मुंबई,मुंबईत काम आहे पैसा आहे.काम मिळाल्यावर आपली पाळेमुळे विसरायला लावणारी मुंबई इथे दिसते.रात्रीच्या मुंबईतील अनेक सर्वसामन्य लोकांच्या खडतर आयुष्यातील प्रसंगाचा कोलाज बघता बघता प्रेक्षक या शहरात हरवून जातात. आणि त्याच वेळी रात्र-प्रहरी लोकलमधून प्रवास करणारी प्रभा (कनी कुश्रुती) दिसते.

प्रभा हॉस्पिटल मध्ये नर्सचे काम करते, ती स्वतःच्या जगात खुश आहे.हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या अन्य नर्स बरोबर मौजमजा करायला ती कुठे जात नाही.काम झाल्यावर ती घरी येते.तिची रूम पार्टनर अनू ( दिव्या प्रभा) या महिन्यातही  घरभाडे द्यायला असमर्थ आहे. तरीही प्रभा तिच्या वतीने भाडे भरण्यास तयार आहे.प्रभा काम करते त्या हॉस्पीटलमधील पार्वती मावशी (छाया कदम) आपल्या व्यक्तिगत प्रश्नांशी झुंज देत आहे.प्रभा त्यांनाही मदत करायला तयार आहे.प्रत्येकाचे व्यक्तिगत प्रश्न आहेत.प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे.एकेका प्रसंगातून ते उलगडत जातात.

सिनेमा हे Audio-visual माध्यम आहे.त्यामुळे तेथे कॅमेरा बोलका आणि संवाद मोजके असणे अपेक्षित असते.या सिनेमात कॅमेरा सतत काही तरी सांगत असतो.त्यामुळे कमीत कमी संवादात कथेचा आशय प्रेक्षकांच्या लक्षात येतो,त्यातूनच तो त्यात गुंतून जातो.हेच या सिनेमाचे वैशिष्ट्य!शहरात काम मिळवण्यासाठी गाव सोडणाऱ्या प्रत्येकासाठी आणि शहरात गेल्यावरच आपल्या मुलामुलीचे कल्याण होणार आहे या आशेवर गावात राहणाऱ्या सर्व पालकांसाठी हा सिनेमा आहे.हि कथा तीन नायकांची आहे,पण त्यांच्यात आणखी एक नायिका आहे.-मुंबई .कथेमध्ये पुढे काय घडणार आहे.हे सांगणारा हा नव्हे.व्यग्र असलेल्या अनेक स्त्रियांचे अनेक प्रश्न त्यांच्या दृष्टीकोनातून आणि मोजक्या संवादातून शांत चित्ताने अनुभवणे हीच त्याच्या कथानकाची खासियत आहे.

All we Imagine as Light या सिनेमातील अनेक प्रसंग सूचक आहेत.त्यामधून ज्याचे त्याने अर्थ काढावेत.हॉस्पिटल मधून आलेल्या २५ वर्षे वयाच्या स्त्रीला तीन मुले आहेत.एका स्त्रीला संततीनियमाबद्दल जाणून घ्यायचे आहे.पण ती सांगते,असे ऑपरेशन पुरुषांनी केल्यामुळे त्यांच्यातील ताकद कमी होते,असे तिच्या नवऱ्याचे म्हणणे आहे.या प्रसंगातून पुरुषी मानसिकता आणि स्त्रियांची फरफटही दिसते.

हॉस्पिटलच्या काउंटरवर असलेली अनू हे ऐकत असते,परंतु तिचा प्रियकर तिला भेटतो तेव्हा ती सुद्धा अशीच असहाय होते.तिलाही त्याच्याकडून पुरुषी मनोवृत्तीचा अनुभव येतो.हे सर्व प्रसंग इतके सहजगत्या घडतात,पण त्यावरून काय अनुमान काढायचे हा निर्णय लेखिका-दिग्दर्शक पायाल कपाडियांनी प्रेक्षकांवर सोडला आहे..एक होता राजा,एक होती राणी  या पद्धतीची साचे बद्ध गोष्ट नं सांगता,प्रेक्षक हुशार आहे. हे समजून घेत काही प्रसंगाची मालिका तुकड्या तुकड्या मध्ये दाखवून त्या सिनेमाचे कोडे सोडवण्याचे काम त्यांनी प्रेक्षकांवर सोपवले आहे. दिग्दर्शक पायल कपाडियाने याआधी काही शोर्ट फिल्म सुद्धा दिग्दर्शित केल्या आहेत. “Afternoon Clouds” जी ७० कान्स चित्रपटात निवडण्यात आली. “A Night of Knowing Nothing” हि दिग्दर्शिकेची पहिली डॉकूमेंटरी असून जिला ७४ कान्स चित्रपट महोत्सवात  सर्वोत्कृष्ट डॉकूमेंटरी साठी  गोल्डन आय अवार्ड मिळाला आहे.

सर्व सामान्य स्त्रियांची व्यथा अतिशय तरलतेने दाखवताना भावविश्व होण्याचे प्रसंग दिग्दर्शक पायल कपाडियाने All we Imagine as Light मध्ये टाळले आहेत.रोजच्या आयुष्यातील अनेक प्रसंग आजूबाजूला बघतो,तितक्या सहजतेने हा सिनेमा घडतो मध्यांतरानंतर अचानक यातील तीन स्त्रिया समुद्रकिनारीवसलेल्या गावी जातात.आणि कथनक वेगळे वळण घेते. हा भाग पटकथा लेखनामध्ये सहजतेने आला असता तर सिनेमाने आणखी उंची गाठली असती. All we Imagine as Light  मध्ये कनी कुश्रूतीचा संयमित अभिनय दाद देण्यासारखा आहे. दिव्या प्रभाने काही प्रसंग उठावदार पणे साकारले आहेत.छाया कदम यांनी मनात ठसठसणारा राग आणि उफाळून येणारी बंडखोर वृत्ती कमीत  कमी संवादातून अतिशय प्रभावीपणे दाखवली आहे. “लापता लेडीज ,अंधाधून,न्यूड ,सैराट च्या तुलनेत या सिनेमात त्यांना कमी संवाद आहेत ,” तरीही छाया कदम  छा गई असे म्हणावे लागतात.

शहरापासून गावापर्यंत स्त्रियांच्या अस्तित्वाचा झगडा कसा सुरु आहे याचे प्रत्यंतर तिघींच्या वेगवेगळ्या कथांतून समोर येते.अशा अर्थपूर्ण सिनेमांना “एन एफ डी सी” सारख्या संस्थाकडून आर्थिक पाठबळ मिळाले तर प्रेक्षकांना सुजाण करणाऱ्या प्रेक्षकांना सुजाण करणाऱ्या अशा अशा अनेक उत्तम कथा पडद्यावर येऊ शकतील.

भूलभुलैया ३ ,सिंघम अगेन अशा दिवाळी हिट कमर्शियल चित्रपटत येत असताना All we Imagine as Light सारखे चित्रपट येतात व हे चित्रपट सुद्धा प्रेक्षकांचे मने जिंकता या वरून हेच कळते की प्रेक्षकांची नाळ आता हळू हळू चेंज होत आहे. आणि OTT ने या गोष्टी प्रेक्षकांना उपलब्ध करून दिल्या ज्या मुळे जे चित्रपट प्रेक्षक थियेटर मध्ये जाऊन बघणार नव्हते ते चित्रपट प्रेक्षक आता OTT वरती बघून चित्रपट हिट करतायेत.

आज OTT ते चित्रपट दाखवून सिनेमा कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून टाकला.त्यांनी ते सर्व सिनेमे वेब सिरीज दाखवले जे प्रेक्षकांच्या कधी पहानीतच नाही आले. कमर्शीयल चित्रपटांच्या त्याच त्याच रटाळवाण्या चित्रपटानव्यतिरिक्त सुद्धा चित्रपट आहेत.हे प्रेक्षकांना OTT वरती बघायला मिळत आहे.अरुणभ कुमार निर्मित पंचायत,ये मेरी फॅमिली, असपिरंट ज्या प्रेक्षकांना खूपच आवडल्या. All we Imagine as Light डिस्ने हॉटस्टार  वर प्रदर्शित झाली असून प्रेक्षकांनी असे चित्रपट बघून अशा चित्रपटांना यशोशिखरावर नेवून ठेवल्यास उत्तमोत्तम चित्रपटाची निर्मिती करण्याची ओढ नवीन दिगदर्शक व निर्मात्यांना लागेल.

FAQ

Ques-1 ‘ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाईट’ हा चित्रपट कसा पाहायचा?

पायल कापडिया दिग्दर्शित “ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाईट’ हा चित्रपट डिस्ने+हॉटस्टार वरती उपलब्ध आहे.

Ques-2 ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाईट मध्ये काय संदेश आहे?

मुंबईतील दोन महिलांना केंद्रबिंदू ठेवून हा चित्रपट बनवला गेला आहे.सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या मुंबई शहरात एकट्या महिलांच्या उदरनिर्वाहाबद्द्ल हा चित्रपट आहे.

 

Leave a Comment