Ashok Saraf – अशोक सराफ मराठी चित्रपट सृष्टीतील अष्टपैलू कलाकार असून मराठी चित्रपट सृष्टीत एक आदराच स्थान. अशोक सराफ ज्यांना मराठी चित्रपट सृष्टीत अशोक मामा म्हणून देखील ओळखल्या जाते.अशोक सराफ यांना कुणी ओळखत नाही अस कुणी नाही मराठी चित्रपट सृष्टीच नाही तर प्रेक्षकांनी सुद्धा अशोक सराफ या कलाकारावर भरभरून प्रेम केल आहे व अजूनही करतच आहे.अशोक सराफ यांनी मराठीच नाही तर आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत देखील मोठ नाव कमावले आहे.काळ कितीही बदलला असला तरी अशोक मामांचे चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात असून आजही त्यांचे चित्रपट प्रेक्षक आवडीने बघतात.मराठी चित्रपट सृष्टीत अशोक सराफ यांची ओळख विनोदी बादशाह अशी असून त्यांनी गंभीर भूमिका सुद्धा त्याच ताकदीने सादर केल्या.चित्रपट सृष्टीत पाच दशकाहून अधिक काळ गेला असून त्यांची जादू आजही चित्रपट सृष्टीत शाबुद असून पिढ्यान पिढ्या त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान त्यांनी मिळवले आहे. Ashok Saraf – अशोक सराफ मराठी चित्रपट सृष्टीतील अष्टपैलू कलाकार.
अशोक सराफ यांची सुरुवातीची कारकीर्द
अशोक सराफ यांचा जन्म ४ जून १९४७ रोजी मुंबई ,महाराष्ट येथे झाला.मुंबई मध्ये चिखलवाडी परिसरात ते लहानाचे मोठे झाले असून लहानपणापासूनच त्यांचा पाया कला तसेच सांस्कृतिक मुळासह जोडला गेला होता.लहानपणापासूनच अशोक सराफ यांना अभिनयाची आवड होती शालेय तसेच महाविद्यालयात असताना त्यांनी नाट्य स्पर्धे मध्ये भाग घेऊन अभिनयाची कला मजबूत करण्यास सुरुवात केली. अशोक सराफ यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर खऱ्या अर्थाने रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली.व येथूच त्यांची ओळख अनुभवी कलाकार व दिग्दर्शका सोबत झाली.रंगभूमीवर आपली अभिनयाची कला मजबूत करत त्यांनी आपला मोर्चा मोठ्या पडद्याकडे वळवला व चित्रपट सृष्टीत स्वतःच वेगळा ठसा उमटवला. Ashok Saraf – अशोक सराफ मराठी चित्रपट सृष्टीतील अष्टपैलू कलाकार.
अशोक सराफ यांची मराठी चित्रपट सृष्टीतील कारकीर्द
अशोक सराफ यांनी रंगमंचावर काम करत असताना आपला मोर्चा मराठी चित्रपटाकडे वळवला.अशोक सराफ यांनी २५० पेक्षा जास्त चित्रपटामध्ये काम केले असून १९६९ साली प्रदर्शित झालेली जानकी या मराठी चित्रपटातून अभिनयास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात दोन्ही घरचा पाहुणा (१९७१),जवळ ये लाजू नको (१९७९),धूम धडाका (१९८५) अशा दर्जेदार चित्रपटात अशोक सराफ यांनी काम केले.अशोक सराफ यांनी मराठी चित्रपट सृष्टीत स्वतःच ठसा उमटवत असताना त्यांनी हिंदीत सुद्धा आपला ठसा चांगलाच उमटवला. Ashok Saraf – अशोक सराफ मराठी चित्रपट सृष्टीतील अष्टपैलू कलाकार.
अशोक सराफ यांनी काम केलेले सर्व विनोदी चित्रपट हे क्लासिक चित्रपट ठरले असून अशी हि बनवा बनवी हा चित्रपट त्यांच्या करियर मधला टर्निंग पौईट सिद्ध झाला.लक्ष्मीकांत बेर्डे, सुशांत रे,निवेदिता सराफ,सुप्रिया पिळगावर अभिनित या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन यांनी केले होते.हा चित्रपट आतापर्यंतच्या विनोदी चित्रपटापैकी एक मानला जातो.या चित्रपटात त्यांनी सादर केलेली धनंजय माने हि भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे, अशी हि बनवा बनवी हि मल्टीस्टारर फिल्म असून एक माईलस्टोन फिल्म आहे.
अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे,सचिन पिळगावकर,महेश कोठारे हि चित्रपट सृष्टीतल हिट जोडी असून या सर्व जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. १९८० ते १९९० हा मराठी चित्रपट सृष्टीतील सुवर्णकाळ होता.या सर्व जोडीने मराठी चित्रपट सृष्टीतला एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले होते.आयत्या घरात घरोबा, एक डाव भुताचा,असे अनेक विनोदी चित्रपट अशोक सराफ यांनी केले असून दादा कोंडगे बरोबर केलेला पांडू हवालदार हा सुद्धा अशोक सराफ यांचा एक जबरदस्त हिट सिनेमा होता.१९८० ते १९९० हा काळ म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतल अशोक सराफ यांचा होय त्यांच्या डोक्यावरील कर्ली केस, बारीक मिशी व शर्टाची वरील बटन उघडी असा त्यांच्या पेहराव जो प्रेक्षकांना नेहमी आपलासा वाटे. Ashok Saraf – अशोक सराफ मराठी चित्रपट सृष्टीतील अष्टपैलू कलाकार.
अशोक सराफ यांचा बॉलीवूड प्रवास
अशोक सराफ यांनी मराठी प्रमाणे हिंदी चित्रपटात सुद्धा काम केले आहे.परंतु हिंदी चित्रपटात त्यांच्या वाट्याला दुहेरी भूमिकाच आल्या दुहेरी भूमिका मिळून सुद्धा त्यांनी त्या भूमिकेला योग्य असा न्याय दिला.मराठी चित्रपट सृष्टीत विनोद करणारे अशोक सराफ यांची हिंदी चित्रपट सृष्टीतल दुहेरी भूमिका सुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या यावरून अशोक सराफ हे गंभीर अभिनेत असल्याचे सुद्धा लक्षात येते.यामुळे अशोक सराफ यांची प्रतिमा केवळ मराठी चित्रपट सृष्टीपुरती मर्यादित राहिली नसून त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत यशस्वी रित्या प्रवेश केला.१९९० च्या दशकात अशोक सराफ हा परिचित चेहरा होऊन गेला होता.हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांनी मोठमोठ्या निर्मात्या सोबत दिग्दर्शक,तसेच कलाकारांबरोबर काम केले करण अर्जुन(१९९५),कोयला (१९९७), येस बॉस (१९९७) बंधन (१९९८) तसेच रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम (२०११) अशा दर्जेदार चित्रपटात काम करून त्यांनी लौकिकता मिळवली सिंघम या चित्रपटातील त्यांची कॉन्स्टेबल सावळकर हि भूमिका प्रेक्षकांच्या खूप लक्षात राहिली. Ashok Saraf – अशोक सराफ मराठी चित्रपट सृष्टीतील अष्टपैलू कलाकार.
अशोक सराफ यांची दूरदर्शन मधील कारकीर्द
अशोक सराफ यांनी आपला अभिनयाचा प्रवास हा चित्रपटापर्यंतच मर्यादित ठेवला नसून टी.व्ही.मालिका कडे सुद्धा वळवला चित्रपटा प्रमाणे मराठी टी.व्ही.मालिका मध्ये सुद्धा त्यांनी आपला ठसा उमटवला एकता कपूर निर्मित हम पाच या मालिके मध्ये अशोक सराफ यांनी काम केले १९९५ मध्ये प्रदर्शित झालेली हि मालिका त्यावेळेस प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावरती घेतली होती.हम पाच हि एक हिंदी सिटकॉम मालिका होती ज्या मालिके मध्ये अशोक सराफ यांनी पाच विचित्र मुलींचा त्रास दायक वडील आनंद माथुर ची भूमिका केली होती.हा शो १९९० च्या दशकातील विनोदी मालिकांपैकी एक मालिका असून त्यावेळेस चा प्रचंड हिट शो होता. या शो मध्ये प्रिया तेंडूलकर,शोमा आनंद,वंदना पाठक असे सह कलाकार असल्यामुळेत्यांच्या सोबत त्यांची केमेस्ट्री चांगलीच जुळली होती हा शो त्यावेळेस घराघरात ओळखला जातो.
अशोक सराफ यांचा रंगभूमी प्रवास
अशोक सराफ यांचा अभिनया ची कारकीर्द हि मराठी रंगभूमी पासून सुरु झाली होतीरंगभूमी हे नेहमीच अशोक सराफ याचं पाहिलं प्रेम राहील आहे.रंगभूमी कडे ते नेहमीच आदराने बघतात रंगभूमीवर सुद्धा त्यांनी लोकप्रिय नाटकांमध्ये काम केले आहे.एक उनाड दिवस,व्हॅक्क्युम क्लीनर,सारख छातीत दुखतेय,लगीन घाई अशा लोकप्रिय नाटकांमध्ये अशोक सराफ यांनी काम केले आहे. अभिनयाची शिस्त व शिकण्याचे सर्व श्रेय ते नेहमीच रंगमंचाला देतात त्यांच्या नाटकांमध्ये नेहमीच विनोदाचा मेळ चांगल्या प्रकारे घालण्यात आला.रंगभूमी मुळेच ते एक Ashok Saraf – अशोक सराफ मराठी चित्रपट सृष्टीतील अष्टपैलू कलाकार.
अशोक सराफ यांचा वैयक्तिक आयुष्य
अशोक सराफ यांनी मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता जोशी सोबत १९९० लग्न केल.अशोक सराफ व निवेदिता जोशी यांनी एकत्र नवरी मिळे नवऱ्याला,चंगू मंगू,अशी हि बनवा बनवी,धूम धडाका अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले असून अनिकेत सराफ हा मुलगा आहे. अशोक सराफ व निवेदिता जोशी सराफ हि मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध जोडी असून त्यांची प्रसिद्ध जीवन शैली व दीर्घकालीन नात्यासाठी चांगलीच ओळखली जाते.
अशोक सराफ यांना पुरस्कार व मान्यता
अशोक सराफ यांना चित्रपट तसेच नाट्य क्षेत्रातील कार्या साठी अनेक पुरस्कार देऊन मान्यात देण्यात आली असून त्यांना फिल्म फेअर मराठी लाईफ टाईम अचीवमेंट अवार्ड, व्ही.शांताराम अवार्ड (२००६), संगीत नाटक अॅकेडमिक अवार्ड २०२२,महाराष्ट्र भूषण (२०२३),पद्मश्री (२०२५) पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.मराठी तसेच भारतीय चित्रपट सृष्टीतल अशोक सराफ हे दिग्ग्ग्ज कलाकार असून या सर्व पुरस्काराचे ते नक्कीच हकदार होते.त्यांनी समीक्षकांना तसेच चाहत्यांना कधीच निराश केले नाही त्यामुळेच Ashok Saraf – अशोक सराफ मराठी चित्रपट सृष्टीतील अष्टपैलू कलाकार.अशोक सराफ हे एक हृदय स्पर्शी कलाकार असून लक्ष्मीकांत बेर्डे,सचिन,महेश कोठारे, यांच्या सोबत केलेले चित्रपट हे खरच १९९० च्या काळातील मराठी चित्रपटातील सुवर्ण क्षण असलेले चित्रपट आहे.अशोक सराफ हे खऱ्या अर्थाने मराठी चित्रपट सृष्टीतल आयकॉन असून त्यांनी केलेल्या भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे व ते कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहील. Ashok Saraf – अशोक सराफ मराठी चित्रपट सृष्टीतील अष्टपैलू कलाकार.