मनोज कुमार – एक देशभक्त चित्रपट दिग्दर्शक ज्यांची भारतीय चित्रपट सृष्टीत ओळख भारत कुमार या नावाने सुद्धा आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतील मनोज कुमार हे एक प्रमुख नाव त्यांनी अभिनेता,दिग्दर्शक तसेच निर्माता अशी कामगीरी त्यांनी चित्रपट उद्योगात पूर्ण केली.मनोज कुमार यांची कारकीर्द भारतीय चित्रपट सृष्टीत अनेक दशकांची असून दादासाहेब फाळके या अवार्ड ने ते सन्मानित सुद्धा आहे.भारतीय चित्रपट सृष्टीत त्यांचे योगदान मोलाचे असून हिंदी चित्रपट सृष्टीत मनोज कुमार यांनी महत्वपूर्ण काम केले आहे जे आजची प्रेक्षकांची लक्षात आहे.त्यांचे चित्रपट नेहमीच देशभक्तीपर आणि सामाजिकदृष्ट्या नेहमीच बांधलेले होते.मनोज कुमार यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी झाला.मनोज कुमार हे भारतीय चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध व्यक्तीमत्व आहे. मनोज कुमार – एक देशभक्त चित्रपट दिग्दर्शक.
मनोज कुमार यांचे प्रारंभिक जीवन
मनोज कुमार यांचा जन्म हरिकृष्ण गिरी गोस्वामी म्हणून २४ जुलै १९३७ रोजी पंजाबी हिंदू ब्राम्हण कुटुंबात झाला. वयाच्या दहाव्या वर्षी भारताच्या फाळणी मुळे ते दिल्ली येथे स्थलांतरित झाले.चित्रपट सृष्टीत येण्याआधी त्यांनी हिंदू कॉलेज मधून बॅचलर ऑफ आर्ट्स हि डिग्री संपादित केली.त्यांना लहानपणा पासूनच कलेची आवड असल्यामुळे त्यांनी आपल्या करियरचा मोर्चा अभिनयाकडे वळवळा.१९४९ दिलीप कुमार यांचा शबनम हा चित्रपट पाहिला या चित्रपटात दिलीप कुमार यांचे नाव मनोज कुमार असल्यामुळे त्यांनी सुद्धा आपले नाव मनोज कुमार ठेवायचे पक्क केले.व मनोज कुमार या नावाने त्यांनी चित्रपट सृष्टीत चांगलाच ठसा उमटवला सुद्धा.दिल्ली येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते मुंबई येथे रवाना झाले.परंतु हा प्रवास इतका सोपा नव्हता,मनोज कुमार हे नाव भारतीय चित्रपट सृष्टीत उउमटवण्यासाठी त्यांनी कठोर मेहनत घेतेली. मनोज कुमार – एक देशभक्त चित्रपट दिग्दर्शक
मनोज कुमार यांचा भारतीय चित्रपट सृष्टीत प्रवेश
मनोज कुमार यांचा भारतीय चित्रपट सृष्टीत प्रवेश चांगलाच संघर्षमय होता.सुरुवातीच्या काळात त्यांना अभिनयाच्या भूमिका मिळणे खूप कठीण होत होत्या परंतु अनेक प्रयत्ना नंतर लेखराज भाकरी दिग्दर्शित फॅशन १९५७ या चित्रपटात काम मिळाले या चित्रपटात त्यांच्या सोबत मला सिन्हा व प्रदीप कुमार होते.परंतु या चित्रपटातील त्यांची भूमिका खास लक्षात राहिली नाही.परंतु या चित्रपटात त्यांना अनुभव चांगला मिळाला.परंतु १९६१ रोजी एच.एस.रवेल दिग्दर्शित कांच की गुडिया या चित्रपटात त्यांना मोठा रोल मिळाला जो त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट होता. मनोज कुमार – एक देशभक्त चित्रपट दिग्दर्शक
मनोज कुमार यांनी सुरुवातीच्या काळात चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारल्या असून विजय भट्ट दिग्दर्शित हरियाली और रास्ता १९६२ तसेच १९६४ रोजी आलेली राज खोसला दिग्दर्शित वो कौन थी? या चित्रपटा द्वारे मनोज कुमार यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली या चित्रपटात त्यांच्या सोबत साधना तसेच प्रेम चोप्रा हे कलाकार होते.या चित्रपटातील अभिनया द्वारे खऱ्या अर्थाने त्यांनी बॉलीवूड मुध्ये अभिनेता म्हणून नाव स्थापन होण्यास मदत झाली. मनोज कुमार – एक देशभक्त चित्रपट दिग्दर्शक.
मनोज कुमार यांचे अभिनया सोबत दिग्दर्शनात पदार्पण
मनोज कुमार हे १९६० ते १९७० च्या दशकात प्रसिद्धीच्या शिखरावर होते.मनोज कुमार हे त्यांच्या विशिष्ट व्यक्ती रेखेसाठी चांगलेच प्रसिद्ध होते.बहुतेक चित्रपट त्यांनी हे कोट घालून केले असल्यामुळे प्रेक्षकांना ते खूपच पसंद पडले.त्यांचे बहुतेक चित्रपट हे देशभक्ती,राष्ट्रवाद आणि सामाजिक गोष्टीवर प्रेरित होते.उपकार हा त्यांचा पहिला दिग्दर्शित चित्रपट असून हा चित्रपट समीक्षक व व्यवसायिक दृष्ट्यादोन्ही बाजूंनी यशस्वी ठरला. उपकार चित्रपट १९६७ रोजी प्रदर्शित झाला असून हा एक देशभक्ती पर चित्रपट होता. या चित्रपटासाठी त्यांचे चांगलेच कौतुक देखील झाले.उपकार हा चित्रपट मनोज कुमार लिखित व दिग्दर्शित असून आशा पारेख, प्राण, प्रेम चोपडा असे दिग्गज कलाकार होते. मनोज कुमार – एक देशभक्त चित्रपट दिग्दर्शक.
उपकार नंतर मनोज कुमार यांचे सुवर्ण क्षणच जणू सुरु झाले त्यांनी १९७४ मध्ये रोटी कपडा और मकान या जबरदस्त चित्रपटाचे दिग्दर्शन केले जो चित्रपट व्यवसायिकदृष्ट्या बॉक्स ऑफिस वरती जबरदस्त हिट होता या चित्रपटात शशी कपूर, अमिताभ बच्चन,मौसमी चॅटर्जी,झीनत अमान असे दिग्गज कलाकार होते.लक्ष्मीकांत-प्यारेलाल च संगीत असलेला हा चित्रपट सामाजिक न्याय तसेच देशभक्ती राष्ट्रीय अभिमान या गोष्टीवर केंद्रित होता.रोटी कपडा मकान या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मनोज कुमार – एक देशभक्त चित्रपट दिग्दर्शक.
मनोज कुमार यांनी नेहमीच सामन्य माणसाला केंद्रित करून देशभक्ती पर चित्रपट बनवले.राज कपूर नंतर त्यांना सुद्धा प्रेक्षकांची काही तरी नाळ कळली होती.त्यामुळेच प्रेक्षकांनी त्यांच्या चित्रपटाना भरभरून प्रतिसाद दिला.व ते सर्वात प्रिय अभिनेत्यापैकी एक बनले. मनोज कुमार – एक देशभक्त चित्रपट दिग्दर्शक.
मनोज कुमार यांचे दिग्दर्शनातील यश
मनोज कुमार यांनी अभिनया सोबत दिग्दर्शनात १९६७ साली उपकार या चित्रपटाद्वारे पदार्पण केले या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वरती चांगलेच यश मिळवले.उपकार या चित्रपटासाठी मनोज कुमार यांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला.उपकार नंतर मनोज कुमार यांनी १९७० मध्ये पूरब और पश्चिम नामक चित्रपट दिग्दर्शित केला जो पाश्चात्य संस्कृतीच्या विरोधातील मुल्यावरती आधारित होता.हा मनोज क्कुमार यांचा क्लासिक चित्रपट असून एक मल्टीस्टारकास्ट असलेला चित्रपट होता. मनोज कुमार – एक देशभक्त चित्रपट दिग्दर्शक.
१९८१ मध्ये मनोज कुमार यांनी क्रांती या चित्रपटाचे दिग्दर्शन केले हा चित्रपट भारतीय चळवळी दरम्यान घडलेल्या काही घटनाववरती आधारित होता.क्रांती हा मनोज कुमार यांचा मल्टीस्टारर चित्रपट होता.दिलीप कुमार,शशी कपूर,शत्रुघ्न सिन्हा,हेमा मालिनी,परवीन बाबी अभिनित हा चित्रपट जबरदस्त अक्शन पट असून देशभक्ती पर आधारित होता.जो लोकांच्या चांगलाच पसंतीस पळून व्यवसायिक दृष्ट्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वरती चांगली कमाई देखील केली. मनोज कुमार – एक देशभक्त चित्रपट दिग्दर्शक.
मनोज कुमार यांचे चित्रपट देशभक्ती पर तसेच समाजिक समस्या यावरती आधारित असून प्रेक्षकांनी त्यांच्यासर्वच चित्रपटाचे कौतुक केले.मनोज कुमार यांची भारतीय चित्रपट सृष्टीत मोलाचे कौतुकास्पद काम आहे. मनोज कुमार – एक देशभक्त.
मनोज कुमार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
मनोज कुमार – एक देशभक्त चित्रपट दिग्दर्शक असून भारतीय चित्रपट सृष्टीत त्यांचे मोलाचे योगदान आहे व याच योगदाना बद्दल त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात सुद्धा आले आहेत त्यांना १९९२ मध्य पद्मश्री तसेच १९९९ मध्ये लाईफ टाईम अचीव्हमेंट अवार्ड मिळाला असून. २०१५ मध्ये चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार दादासाहेब फाळके हा पुरस्कार प्रणब मुखर्जी द्वारे देऊन सन्मानित करण्यात आले. मनोज कुमार यांना मनोज कुमार यांना त्यांच्या पहिला चित्रपट उपकार या चित्रपटा साठी सुद्धा फिल्म फेअर अवार्ड मिळाला आहे.मनोज कुमार यांचा प्रभाव भारतीय चित्रपट सृष्टीवर प्रचंड मोठा असून ते चित्रपट सृष्टीतील प्रतिष्टीत व्यक्तिमत्वापैकी एक आहे.मनोज कुमार – एक देशभक्त.
मनोज कुमार यांचे वैयक्तिक जीवन
मनोज कुमार यांचे लग्न शशी गोस्वामी यांच्या सोबत झाले असून त्यांना दोन मुले आहेत.अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून ते लाईम लाईट मध्ये असले तरी त्यांनी त्यांचे वैयक्तिक आयुष्य लाईम लाईट पासून नेहमीच दूर ठेवले.आपले वैयक्तिक आयुष्य हे लाईम लाईट मध्ये ठेवण्या पेक्षा त्यांनी संपूर्ण लक्ष लक्ष कामावर केंद्रित करून उत्तमोत्तम चित्रपट कसे बनवता येईल यावरती केंद्रित केले. मनोज कुमार – एक देशभक्त चित्रपट दिग्दर्शक.
निष्कर्ष
मनोज कुमार – एक देशभक्त चित्रपट असून त्यांनी उपकार,पूरब और पश्चिम,रोटी कपडा और मकान, क्रांती असे उत्तमोत्तम चित्रपट दिग्दर्शित करून भारतीय चित्रपट सृष्टीत आपला ठसा उमटवला. मनोज च कुमार यांचे चित्रपट सृष्टीसोबतच मोठ मोठ्या राजकारणी लोकांसोबत सुद्धा चांगले संबंध होते.१९६५ च्या भारत-पाक युद्धा नंतर भारताचे माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांनी मनोज कुमार यांना जय जवान जय किसान या त्यांच्या प्रसिद्ध नाऱ्या वरती एक चित्रपट बनवायला सांगितला व हिच गोष्ट लक्षात ठेवून त्यांनी उपकार या चित्रपटाची निर्मिती केली ज्या चित्रपटाची खूप तारीफ करण्यात आली. मनोज कुमार यांनी सातत्याने प्रेम नाथ,प्राण,प्रेम चोप्रा कामिनी कौशल,हेमा मालिनी यांच्या सोबत सातत्याने काम केले असून ते दिलीप कुमार राज कपूर,धर्मेंद्र यांच्या खूप जवळचे मित्र होते.१९६० ते १९८० हा काळ मनोज कुमार यांचा सुवर्ण काळ ठरला.मनोज कुमार यांचे चित्रपट व्यवसायिक यशासाठी नव्हे तर देशभक्ती,समाजिक न्याय व उत्तम संदेशा साठी आजही लक्षात ठेवले जातात.मनोज कुमार – एक देशभक्त.